Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पिंपरी-चिंचवड

दिव्यांगांसाठी सुविधा, रोजगार, प्रशिक्षणाला चालना; शहर अधिक समावेशक करण्याचा निर्णय!

दिव्यांगांसाठी सुविधा, रोजगार, प्रशिक्षणाला चालना; शहर अधिक समावेशक करण्याचा निर्णय!

पिंपरी : दिव्यांग नागरिकांना समान संधी, आवश्यक सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देत त्यांचे जीवन अधिक सुलभ व सक्षम करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीने दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या संचालक मंडळाची बैठक आयुक्त तथा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॅा.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

viara vcc
viara vcc

बैठकीत दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास, पुनर्वसन, आरोग्य आणि सर्वांगीण सक्षमीकरणासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, कंपनी सचिव गिरीश परळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे सल्लागार विजय कान्हेकर, वास्तुविशारद व सल्लागार अभिजित मुरुगकर यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातील उद्यानांमध्ये संवेदनानुभव उद्यान दिव्यांग मुलांना आणि व्यक्तींना निसर्गाच्या सान्निध्यात आनंददायी व संवेदनात्मक अनुभव घेता यावा, यासाठी शहरातील विविध उद्यानांमध्ये ‘संवेदनानुभव उद्यान’ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उद्यानांमध्ये स्पर्श, ध्वनी, सुगंध आणि दृश्य अनुभवांच्या माध्यमातून दिव्यांग मुलांच्या संवेदनात्मक विकासाला चालना देण्यासोबतच त्यांना मनोरंजन आणि आनंदाचे हक्काचे स्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिव्यांगांच्या रोजगारासाठी उद्योग क्षेत्राशी समन्वय दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड परिसरातील तसेच आजूबाजूच्या विविध औद्योगिक वसाहतींमधील उद्योग आणि आस्थापनांशी समन्वय साधण्यात येत आहे.

आतापर्यंत १२०० पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींची नोंदणी झाली असून, त्यापैकी सुमारे ६५० व्यक्तींची माहिती तपासणी व कौशल्यनिहाय जुळवणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी ३५ दिव्यांग व्यक्तींना विविध आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, त्या समाधानकारकपणे कार्यरत आहेत, अशी माहिती फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी बैठकीत दिली. दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय उद्योग महासंघाचे संचालक प्रसाद बच्छाव यांच्याशी आयुक्त डाॅ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी संवाद साधला. त्यांच्या माध्यमातून विविध कंपन्यांशी संवाद साधून दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"