Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
कला साहित्य

आशाताईंच्या पुरस्काराने उत्तम गायनाची प्रेरणा: श्रेया घोषाल!

आशाताईंच्या पुरस्काराने उत्तम गायनाची प्रेरणा: श्रेया घोषाल!

पिंपरी : संगीतासाठी अथक तपश्चर्या आणि साधनेची आवश्यकता असून आशाताईंच्या संगीत साधनेच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न मी करत आहे. आशाताईंच्या पुरस्काराने मला उत्तम गायनाची प्रेरणा मिळाली आहे असे मत प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांनी व्यक्त केले. पार्श्वगायिका आशा भोसले पुरस्कार स्वीकारताना प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृहात त्या बोलत होत्या.

viara vcc
viara vcc

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी देण्यात येणारा 21 वा प्रतिष्ठित अशा भोसले पुरस्कार 2026 प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना शनिवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, जेष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, आमदार अमित गोरखे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष योगेश बहल, कृष्णकुमार गोयल, मृणाल संकला अदींसह कला सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्रेया घोषाल पुढे म्हणाल्या की प्रत्येक नवीन गाणे गाताना त्यामागची भावना काय असावी याबाबत विचार केला की, मी आशाताईंच्या गाण्यांचा विचार करते. त्या हे गाणे कशा गातील या विचाराने मी त्यामध्ये गाण्यात भाव वाढण्याचा प्रयत्न करते. आशाताईंनी वैविध्यपूर्ण गीते गायली. त्यांच्याकडून मी आजही प्रेरणा घेते. या दिग्गजांच्या पर्वात मला शिकण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. अशा भोसले पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की मी श्रेयाला लहान असताना गाताना ऐकले आहे. त्यावेळेस तिच्यातली चुनुक ओळखली होती. मला तेव्हाच वाटले की, ही एक मोठी गायिका होईल. श्रेया यांना माझा कायम आशीर्वाद आहे. आशाताईंच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार नक्कीच विशेष आहे. सुरेल गायिका श्रेया घोषाल यांना हा पुरस्कार मिळाला. हे पिंपरी चिंचवड शहराचे भाग्य आहे असे मत आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखण्यास भाऊसाहेब भोईर यांचा मुख्य वाटा आहे असे मत आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले.

पुरस्कार कार्यक्रमानंतर श्रेया घोषाल यांनी प्रेक्षकांच्या फर्माईशी वरून अधीर मन झाले, तरुण आहे रात्र अजुनी, जाने क्या बात है, मेरे ढोलना सुन ,रेशमाच्या रेघांनी अशी गाणी गाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"