Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

29th October 2026
गुन्हेगारी

ऑटोमोबाईल व्यवसायिकाची 2 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक!

ऑटोमोबाईल व्यवसायिकाची 2 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : ऑटो मोबाईल व्यावसायिक यांच्या अकाउंटंट एक्झिटिव्ह यांच्या व्हाट्सअप नंबरचा एक्सेस घेऊन त्यावर व्यावसायिकाचा व्हाट्सअप नंबर व फोटो टाकून व्यावसायिक बोलत आहे असे भासवून वेगवेगळ्या बँक अकाउंट वर 2 कोटी 20 लाख रुपये पाठवण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली. ही घटना गुरुवार 13 व 14 ऑगस्ट दरम्यान सर्वे नंबर 51, पुणे -मुंबई बायपास बावधान येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी कनवरजीत सिंग सेहगल (वय 54, रा.ऋ पाच वर्षा पार्क, बाणेर ) यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात सायबर शाखेकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे अकाउंटंट एक्झिटिव्ह यांचे व्हाट्सअप नंबरचा एक्सेस घेऊन फिर्यादी यांचा व्हाट्सअप नंबर ब्लॉक करून मोबाईल क्रमांकच्या डीपीवर फिर्यादी यांचा फोटो ठेवून त्यावर फिर्यादीचे नाव सेव्ह करून अकाउंट एक्झिटिव्ह यांच्याशी फिर्यादी हेच बोलत आहे असे भासवून वेगवेगळ्या बँक अकाउंट वर एकूण 2 कोटी 20 लाख रुपये पाठवण्यास सांगून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे. सायबर शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कातकाडे, पोलीस निरीक्षक गायकवाड हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"