Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

31st October 2026
गुन्हेगारी

दोन कोटीचा गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपीला नऊ महिन्यानंतर अटक!

दोन कोटीचा गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपीला नऊ महिन्यानंतर अटक!

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची कामगिरी
पिंपरी : बँक खात्यात पी एफ आय सी संबंधित पैसे जमा झाले असून तुम्हाला अटक होऊ शकते अशी भीती दाखवून सेवानिवृत्त बँक अधिकारी आणि त्यांच्या पत्नीची दोन कोटी 14 लाख 70 हजार 358 रुपयांची फसवणूक करण्यात आली. यातील मुख्य आरोपीला नऊ महिन्याच्या परिश्रमानंतर पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे.

viara vcc
viara vcc

राजेंद्र गणराज नागर (वय 32, जलखोडा, ता. नैनवा, जि. बुंदी, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपींनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पती-पत्नीच्या बँक खात्याची माहिती मिळविली. तुमच्या खात्यात पीएफआयसी संबंधित रक्कम जमा झाल्याचे सांगून अटकेची भीती दाखवली. बनावट पोलीस कागदपत्रे आणि नोटीसा दाखवून खात्यातील रकमेची पडताळणी करून ती रक्कम परत केली जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर आरोपीने विविध बँक खात्यातून दोन कोटी 14 लाखाहून अधिक रक्कम वळवून घेतली. या प्रकरणी 17 नोव्हेंबर 2025 रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीने फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी सहा बँक खात्याचा वापर केल्याचे उघड झाले. एम. एस. सुलतान कंट्रक्शन अँड मटेरियल सप्लायरच्या आयसीआयसीआय बँक खात्यात 49 लाख वीस हजार दोनशे रुपये जमा झाले होते. त्यापैकी 38 लाख रुपये दुसऱ्या खात्यात वर्ग करून दुसऱ्याच दिवशी धनादेशाद्वारे काढण्यात आले. हे खाते नागरच्या नावावर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. नागर यांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावल्यानंतर तो चौकशीत हजर राहिला नाही. त्यांनी मोबाईल बंद केला होता.

बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी स्वतःचे पैसे काढताना दिसला. मोबाईल सीडीआर आणि तांत्रिक विश्लेषणातून त्याचे राजस्थान मधील बुंदी येथील ठिकाण निष्पन्न झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने 8 ऑगस्ट रोजी त्याला राजस्थान मधून अटक करण्यात आले. नागर याने चौकशीत अरविंद उर्फ राजा यांच्या मदतीने बँक खात्यामध्ये पैसे स्वीकारून त्याची विल्हेवाट लावल्याचे सांगितले. या प्रकरणातील अन्य आरोपींचा गुन्हे शाखेतर्फे शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त रोहिदास पवार सहाय्यक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवीकिरण नाळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोषण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे, पोलिस अंमलदार दीपक भोसले, सुभाष पाटील, विनायक म्हसकर ,दीपक माने यांच्या पथकाने केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"