भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी!

पिंपरी : वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने ऑटोरिक्षा चालकाने एका स्कुटी ॲक्टिवा दुचाकीला जोरदार धडक देऊन दोघा जणांना गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवार 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास केएसबी चौकाच्या जवळ, चिखली ते चिंचवड बीआरटी रोडवर ,शाहूनगर, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी शुभम काशिनाथ अक्कलकोटे (वय 28, रा. प्लॉट नंबर 31, 32 साई पार्क, पगडे वस्ती, चऱ्होली खुर्द, ता. खेड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (एम एच 14 /के यु/ 14 41) या ऑटो रिक्षा क्रमांक वरील चालक (नाव पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांची आई स्कुटी ॲक्टिवा गाडी क्रमांक (एम एच 14 /एन एफ /12 09) या दुचाकीवरून फिर्यादीच्या बहिणीकडे हिंजवडी येथे जात असताना केएसबी चौकाजवळ, चिखली ते चिंचवड बीआरटी रोडवर, शाहूनगर येथे रिक्षा क्रमांक एम एच 14 /के यु/ 14 41 वरील चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात रिक्षा चालवून समोरून ॲक्टिवा दुचाकी स्वराला धडक दिली. या धडकेत फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटाची हाड फॅक्चर झाले असून फिर्यादी यांच्या आईचे उजव्या हाताच्या कोपरातील हाड व उजव्या पायाच्या मांडीतील हाड फॅक्चर झाले आहे.ॲक्टिवा गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व कारभळ हे तपास करत आहेत.

