Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

2nd October 2026
पिंपरी-चिंचवड

वाय. सी. एम.रुग्णालय अधिष्ठात्यांविरोधात ॲट्रॉसिटी चा गुन्हा!

वाय. सी. एम.रुग्णालय अधिष्ठात्यांविरोधात ॲट्रॉसिटी चा गुन्हा!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील माजी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरला जातिवाचक शब्द वापरून अपमानित केल्याच्या कारणावरून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र नामदेव वाबळे यांच्या विरोधात संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 ऑगस्ट 2026 रोजी रुग्णालयात घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी रुग्णालयातील एका माजी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरने फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉक्टर राजेंद्र वाबळे (रा. वल्लभनगर, पिंपरी) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 352 तसेच अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

indra dairy
indra dairy

फिर्यादी डॉक्टर वाय. सी. एम. रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सेवेत रुजू होणे, गैरजेरी, विभागीय चौकशी तसेच सेवेतून कमी करण्याच्या कारवाईवरून त्यांचा रुग्णालयाशी वाद सुरू होता. यासंदर्भात त्यांनी विविध शासकीय आणि वैद्यकीय संस्थांकडे तक्रारी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. 10 ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारासंबंधी डॉक्टर अनुभव प्रमाणपत्र घेण्यासाठी वायसीएम रुग्णालयात गेले होते. दुसऱ्या मजल्यावरील लीप्ट समोर डॉक्टर वाबळे यांची भेट झाल्यानंतर अनुभव प्रमाणपत्रातील नोंदी बाबत विचारणा झाली. त्यावेळी डॉक्टर वाबळे यांनी जातीवाचक शब्द वापरून अपमान केल्याचा आरोप संबंधित डॉक्टरांनी फिर्यादीत केला आहे. संबंधित ठिकाणी काही रुग्ण तसेच इतर व्यक्ती उपस्थित असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा कदम करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"