महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरवर कार धडकली; एकाचा मृत्यू!

पिंपरी : पुणे मुंबई महामार्गावर वाहने उभी करण्यास प्रतिबंध असतानाही टँकर चालकाने हाईगाईने व निष्काळजीपणाने कोणतीही पार्किंग सिग्नल न लावता धोकादायक स्थितीत उभी केल्याने पाठीमागून आलेल्या कारची धडक बसून कारमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार 26 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुणे मुंबई विरुद्ध गती महामार्गावर फूड मॉल चे विरुद्ध बाजूस तालुका मावळ येथे घडली.विराज सुरेश धातोड (वय 34) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी साक्षी सुरेश धातोड (वय 22, रा .1701, ए वन, मंत्रा मोनार्क, बालेवाडी, पुणे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रामेद्रकुमार वय 28 मुंबई या टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ विराज सुरेश धातोड (वय 34) हा कामावर जाण्यासाठी बलेनो कार क्रमांक एम एच बारा व्हीएल ३७०९ मधून पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून जात असताना फूड मॉल चे विरुद्ध बाजूस पुणे कडून मुंबईकडे जाणाऱ्या बाजूस टाटा कंपनीचा टँकर क्रमांक एम एच 47 बी वाय 4602 चा चालक आरोपी याने त्याचे ताब्यातील टँकर महामार्गावर पार्किंग करण्यास प्रतिबंध असतानाही निष्काळजीपणे पार्किंग करुन धोकादायक स्थितीत उभा केला. फिर्यादीचा भाऊ विराज सुरेश धातोड (वय 34) हा चालवत असलेली बलेनो कारची टँकरला पाठीमागून धडक बसून गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूस टँकर चालक जबाबदार असून बलेनो कारचे नुकसानीस कारणीभूत झाला आहे. शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक केंद्रे हे तपास करत आहेत.

