Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पिंपरी-चिंचवड

निगडी येथील अप्पूघरचे आधुनिकीकरण खाजगी तत्वावर करणार!

निगडी येथील अप्पूघरचे आधुनिकीकरण खाजगी तत्वावर करणार!

18 कोटी 60 लाख गुंतवणुकीस स्थायीची मान्यता
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख पर्यटन केंद्र असलेल्या निगडी येथील इंदिरा गांधी उद्यानातील अप्पू घर मधील खेळणी जुनी झाल्याने ती बदलून नव्याने अप्पू घर विकसित करण्यासाठी पुष्पक अम्युजमेंट या संस्थेमार्फत 18 कोटी 60 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी दिली.

viara vcc
viara vcc

स्थायी समितीच्या बुधवार 29 जुलै रोजी झालेल्या सभेत अप्पू घर नूतनीकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. 35 वर्षांपूर्वी अप्पू घर प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात आले होते. त्यावेळीच अप्पू घरच्या खेळण्याबाबत अनेक तक्रारी होत्या. या मनोरंजन केंद्रातील खेळणी जुनी बसविली असल्याचा आरोप करण्यात आला होता.. त्यामुळे जुने आणि जीर्ण झालेली यंत्रसामग्री आणि खेळणी परिस्थितीनुसार बदलण्याची गरज देखील आहे. बाजारात नवीन पद्धतीची खेळणी येत असल्याने नव्या पर्यटन स्थळांच्या स्पर्धेशी स्पर्धा करणे येथील ठेकेदारांना अवघड होत आहे असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

पाण्यावरील घसरगुंडी, फ्लाईंग सिनेमा, 360 अंशातील इमर्सिव्ह डोम, हॉरर हाऊस, मिरर मेज व इन्फिनिटी नायगरा कृत्रिम धबधबा, किड्स ट्राफिक पार्क ,अक्रोड गेम्स, एआरव्ही आर झोन ,इंटरऑक्टिव्ह सेल्फी झोन, यासारख्या आधुनिक व थरारक राईटची भर आधुनिकीकरणामुळे पडणार आहे. स्मार्ट पार्किंग ,आधुनिक फूड कोर्ट, डिजिटल तिकीट प्रणाली, पिण्याचे पाणी तसेच ड्रेनेची उत्तम व्यवस्था नव्याने केली जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी फायबर सेफ्टी, सीसीटीव्ही यंत्रणा, आपत्कालीन यंत्रणा, स्ट्रक्चर सेफ्टी, अतिथी विमा सार्वजनिक दायित्व विम्यासह सर्व मानांकनाचे पालन बंधन करण्यात आले आहे.

अप्पूघर आधुनिक पद्धतीने डेव्हलप केल्यानंतर सध्याच्या ठेकेदाराला पुढील पंधरा वर्षासाठी थेट पद्धतीने चालवण्यासाठी देण्यात येणार आहे. सुरुवातीला दहा टक्के भाडे दरवाढ करून दरवर्षी पाच टक्के दरवाढ केली जाणार आहे. या अटीवर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"