Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

26th October 2026
पिंपरी-चिंचवड

अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या युगांडातील तीन परकीय महिलांवर कारवाई !

अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या युगांडातील तीन परकीय महिलांवर कारवाई !

परकीय नागरिक नोंदणी विभागाचे विशेष शाखा दोन यांची कारवाई
पिंपरी : युगांडा देशातील तीन परकीय महिला नागरिकांची व्हिसाची मुदत संपली असताना देखील त्या अनधिकृत पणे राहत असल्याचे निष्पन्न झाले. परकीय नागरिक नोंदणी विभागाचे विशेष शाखा ( दोन)(एफआरओ) यांनी ताब्यात घेऊन डिपोर्टेशनची कारवाई करण्यात आली आहे.

vcc navratri
vcc navratri

डोरेक अहाइस्बीवे (Doreck Ahaisbiwe), प्रोसी अनकुंदा Pprossy Ankunda), अमिना कतुसिमे (Amina Katusiime) अशी कारवाई करण्यात आलेल्या परकीय महिलांची नावे आहेत. तीनही युगांडा देशाच्या महिला या मेडिकल व्हिसा, स्टुडन्ट व्हिसा यावर भारतात आल्या असल्याचे निष्पन्न झाले. व्हिसा मुदत संपल्यानंतरही कोणत्याही प्रकारची भारतात रहावयाची मुदतवाढ न करता अनधिकृत पणे रहात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर परकीय नागरिक नोंदणी विभाग (पीआरओ) यांचे मार्फत कारवाई करण्यात आली.

परकीय नागरिक नोंदणी विभागाचे विशेष शाखा दोन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पावरा यांनी गोपनीय बातमीदारामार्फत व अन्य तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त केली असता हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारुंजी या ठिकाणी काही ओव्हर स्टे आफ्रिकन परदेशी नागरिक रहात असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार 13 ऑक्टोबर रोजी परकीय नागरी नोंदणी विभाग विशेष शाखेचे ( दोन) कडील ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अहमद शेख यांच्या पथकाने हॅपी होम, सर्वे नंबर 7/4 , शॉप नंबर तीन, गेट नंबर पाच, मारुंजी, ता. मुळशी) या ठिकाणी जाऊन पडताळणी केली. सदर ठिकाणी युगांडा देशाच्या संशयित परदेशी महिला आढळून आल्या.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, परदेशी नागरिक आपले रूम, बंगला, फ्लॅट ,हॉटेलमध्ये वास्तव्यास आल्यास त्याबाबत सी फॉर्म भरून 24 तासांचे आत (एफआरओ) पिंपरी चिंचवड येथे माहिती देणे बंधनकारक आहे. माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

सदरची कारवाई धीरज पाटील पोलीस उपायुक्त विशेष शाखा, सुनील पंधरकर सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष शाखा (दोन) विजय वाघमारे, परकीय नागरिक नोंदणी विभागाकडील श्रीमती राजश्री पावरा सहाय्यक पोलीस निरीक्षक, तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अहमद शेख, पोलीस शिपाई अक्षय घोडमारे यांच्या पथकाने केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"