मैदान गाजविणाऱ्या शिलेदारांचे सेनापती

- पूजा शेलार :शिवछत्रपती पुरस्कार विजेती कबड्डीपटू
राज्यातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळविणारी पिंपरी-चिंचवडमधील पहिली महिला कबड्डीपटू पूजा शेलार हिने आमदार महेशदादा लांडगे यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. ती म्हणते, माझ्या कुटुंबाचा आणि दादांचा स्नेह खूप पूर्वीपासूनचा आहे. माझे चुलते भरत पहिलवान आणि दादांचे वडील किसनराव लांडगे कुस्ती क्षेत्रातील दोस्त होते. त्यांच्यातील मैत्रीचा धागा गावाला माहित होता. दोन्ही कुटुंबाला खेळाची पार्श्वभूमी असल्यामुळे हा धागा अधिकच घट्ट विणला. नव्हे तर पुढच्या पिढीतही कायम राहिला, वृद्धींगत झाला.

पूजा म्हणाली, कुस्तीची परंपरा असलेल्या भोसरी गावामध्ये एक मुलगी कबड्डीत यश मिळवण्याचे स्वप्न पाहत असल्याची बाब त्या काळी अनेकांना खटकत असे. मात्र, जिद्दीच्या बळावर, कुटुबांच्या पाठिंब्यावर आणि नाथ साहेबांच्या आशीर्वादाने मी कबड्डीत यश मिळविले. अनेक मैदाने गाजविली. उत्कृष्ट चढाया, पकडी करीत प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणे फेडली. प्रतिस्पर्धी संघांतील खेळाडूंच्या मनांमध्ये आक्रमक वृत्तीने धडकी भरविली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात कबड्डीची पताका उंचावत ठेवली. महेशदादा स्पोर्टस् फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार महेशदादा करीत असलेले कार्य उल्लेखनीय तर आहेच. मात्र, नवोदित खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ आणि स्पर्धांचे आयोजन करणारे माहेरघर आहे.
या कामगिरीची दखल घेत राज्य सरकारचा मानाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. कष्टाचे चीज झाले. तपश्चर्या फळाला आली. आई-वडीलांची पुण्याई नशिबी आली. अर्थात, हे यश फक्त माझ्या कुटुंबाचे नव्हते. तर, माझ्या गावाचे आणि आमदार महेशदादा यांच्यासारख्या भरभक्कम पाठिंबा देणाऱ्या नेतृत्वाचे होते. त्यांच्यामुळेच अशा प्रकारचा पुरस्कार मिळविणारी मी शहरातील पहिली महिला ठरले. या पावलावर पाऊल ठेवून भविष्यात गावातील, शहरातील अनेक खेळाडूंनी शिवछत्रपतीच नव्हे तर अर्जुन, खेलरत्न असे पुरस्कार मिळवावेत, अशी इच्छा पूजाने व्यक्त केली आहे.
दादांनी अनेक खेळाडूंना मनापासून पाठिंबा दिला आहे. दिवस असो किंवा रात्र दादांचा फोन खणखणला की ते नेहमी मदतीसाठी तत्त्पर असतात. अडचणीच्या वेळी लगेचच धावून येतात. सांघिक खेळांमध्ये निवड प्रक्रियेत अन्याय झालेल्या खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात. त्यांच्यावरील अन्यायाविरोधात पेटून उठतात. अखेरीस त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. त्यामुळेच क्रीडा क्षेत्राचा ध्वज खांद्यावर घेऊन मैदाने गाजविणाऱ्या खेळाडू शिलेदारांचे ते सेनापती आहेत. त्यांचा स्वभाव दोस्तीच्या दुनियेतल्या राजा सारखा आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांचा डिजिटल कार्यअहवाल येथे वाचा.
https://tinyurl.com/Shivnerica-Chava-MaheshDada
मतदारसंघासाठी ते दमदार दादा असले तरी आम्हां महिला खेळाडूंसाठी प्रेमळ भाऊ आहेत, असे पूजाने आवर्जून नमूद केले. राजकारणातील दादाची गरुड झेप उत्तुंग आहे. मदत करण्याची वृत्ती त्यांच्या नसानसांत भिनली आहे. त्यामुळेच ते सर्वांना आपले वाटतात. किंबहुना कुटुंबातील सदस्य वाटतात. आमच्या सुखदुःखात सहभागी होतात. कठीण समयी धीर देतात. उचित समयी आधार देतात. ते केवळ गावचे भूषणच नाही तर संपूर्ण शहराचे आभूषण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व भोसरी मतदारसंघाला लाभले, हे भाग्यच म्हणावे लागेल. भविष्यात हाच नेता आम्हांला हवा आहे. त्यांच्या माध्यमातून मंत्रीमंडळात स्थान मिळाले तर, क्रीडा क्षेत्राचे नाव उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास पूजाने व्यक्त केला आहे.