आमदार महेश लांडगे म्हणजे सत्पुरुषच!

- गणेश भुजबळ
‘’छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे, फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव’’
संस्कृत भाषेतील हे सुभाषित सांगते की, वृक्ष स्वत: उन्हात उभे रहातात आणि इतरांना सावली देतात त्यांची फळे सुध्दा इतरांसाठीच असतात. असे वृक्ष म्हणजे जणू सत्पुरुषच!! तसंच, काही माणसे या जगात हिऱ्याप्रमाणे आपल्या कर्तृत्त्वाने नेहमी चमकत असतात आणि इतरांना आदर्श देतात. काही माणसं सागराच्या किनारी असलेल्या दीपस्तंभाप्रमाणे सतत इतरांना दिशा दर्शवित असतात. मार्गदर्शन ककरत असतात. काही माणसे चंदनासारखी स्वतः झिजत असतात आणि इतरांना सुगंध देत असतात. काहीजण हिमालयासारखी उत्तुंग व्यक्तिमत्त्व असणारी असतात. परंतु वरील सर्व वैशिष्ट्ये स्वतःमध्ये एकवटून आमच्या सारख्या सामान्य नागरिकांना आदर्श देणारा, मार्गदर्शन करणारा, झिजणारा, उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा, वटवृक्षाची सावली देणारा, आमच्या सुखदुःखात सदैव सोबत असणारा, आमचे प्रश्न स्वतःचे प्रश्न समजूनच आस्थेने सोडविणारा, मायबापाइतकाच आम्हा सर्वांवर प्रेम, माया करणारा आमचा आधार, निर्भिड, विनम्र, कार्यतत्पर, विनयशील व्यक्तिमत्त्व म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे होय.

मला फार पूर्वीपासून महेशदादांबरोबर काम करण्याची संधी मिळत गेली. मी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे लहानपणापासून शेती आणि बैल हा आमच्या आस्थेचा विषय. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली खिल्लार बैलाची जात ही वृद्धिंगत व्हावी म्हणून दादांबरोबर आम्ही सर्व खिल्लारप्रेमी कार्यरत असतो. बैलगाडा शर्यतीवर जेव्हा बंदी घालण्यात आली तेव्हा याविरोधात सगळ्यात आधी आवाज उठविणारे हे आमदार महेशदादा होते. विधानसभेत या प्रश्नाची मांडणी आणि वाचा फोडणारे आणि हा विषय सोडविण्यामध्ये दादांचा मोठा वाटा होता. विधानसभेत दादांच्या पाठपुराव्योमुळेच हा विषय मार्गी लागला आणि आम्हा सर्व बैलगाडामालकांना, बैलगाडाप्रेमींना आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न दादांनी केला. भोसरी मतदारसंघात भारतातील सर्वात मोठी महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत भरविण्याचा मान महेशदादांना जातो. खिल्लार जात जोपासण्यासाठी खिल्लार जातीच्या बैलांचे भव्य प्रदर्शन भरवून हा वंश टिकून ठेवण्यासाठी दादांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. विधानसभेमध्ये वेळोवेळी आम्हा बैलगाडामालकांच्या समस्या मांडून त्या सोडविणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणजे महेशदादा लांडगे होय.
महेशदादा हे मूळचे पैलवान असल्यामुळे आणि लहानपणापासून कुस्ती क्षेत्र त्यांनी गाजविले असल्यामुळे कुस्ती क्षेत्रासाठी व खेळासाठी दादांचे भरीव योगदान आहे. भोसरीमध्ये अद्ययावत सुविधांनी युक्त असलेले कुस्ती प्रशिक्षण केंद्र हे याचे उदाहरण सांगता येईल. तर आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनची स्थापना करून सर्व प्रकारच्या खेळांसाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी व्यासपीठ निर्माण करण्याचे कार्य या माध्यमातून झाले आहे. आज कबड्डी क्षेत्रात अनेक खेळाडू या फाउंडेशनमार्फत घडत आहेत. जागतिक व राष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्यांच्या आणि कबड्ड्च्या स्पर्धा नियमितपणे दादा आपल्या मतदारसंघात घेत असतात. खेळाडूंना सराव करताना लागणाऱ्या सर्व सुविधा दादांच्या स्पोर्ट्स फाउंडेशनकडून उपलब्ध होत असल्यामुळे खेळाडूंना देखील नवीन उर्मी व बळ मिळत असते.
दादांचे काम हे सर्वसमावेश व सर्व घटकांना पुढे नेऊन त्यांना बळ देणारे आहे. समाजातील तळागाळातील तसेच सर्वात शेवटच्या घटकापर्यंत दादांचे कार्य पसरलेले आहे. महाराष्ट्रातील आमदारांध्ये फारच कमी आमदार व त्यातील एक सर्वात प्रभावी हिंदुत्ववादी आमदार म्हणून दादांचे नाव अग्रक्रमावर राहील.
भविष्यामध्ये आम्हा सर्व शेतकरी बांधवांना, क्रीडाप्रेमींना, खेळाडूंना, पुनःश्च भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून महेशदादा लांडगे हेच हवे आहेत. कारण काजव्याने कितीही स्वयंप्रकाशाने सूर्याचे तेज झाकण्याचा प्रयत्न केला तरी सूर्य हा तेजस्वीच असतो. स्वयंप्रकाशमान असतो आणि आमच्यासाठी आमचा सूर्य हा आमचा दादाच आहे. म्हणून पुन्हा एकच वादा आम्हाला आमदार हवा महेशदादा.