फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
Uncategorized

पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!

पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!
  • पै. प्रगती विनोद गायकवाड (आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू, महिला उपमहाराष्ट्र केसरी)

.. तरी मोडला नाही कणा; पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा..
ज्येष्ठ सहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या या ओळी कोणाही लढणाऱ्या, आयुष्यात हार न मानू इच्छिणाऱ्या, मनात जिद्द बाळणाऱ्या प्रत्येकाला लागू पडतात. अशा व्यक्तींना हवा असतो फक्त लढ म्हणणारा आश्वासक हात आणि मनाला उभारी देणारी खंबीर साथ. हीच साथ अनेकांना महेशदादांच्या मूर्तीत उमगली. कारण, कुस्ती मैदान असो वा आयुष्याचा पट हार – जीत दाखविणाऱ्या दोन्ही पटलांवर कोणाचातरी पाठीवर हात लागतोच.. इथे तोच हात महेशदादा ठेवतात… आणि लढण्याचं बळ देतात..

महेशदादांना फोन केल्यानंतर पलिकडून बोल बाळ, काही अडचण? काय पाहिजे सांग?.. हे कानावर पडणारे मोजके शब्द मनाला धीर देतात, उभारी देतात आणि नव्या जिद्दीने लढण्याची उमेद देतात. एका खेळाडूला आणखी काय हवं? त्यांच्याकडून मिळणारा आश्वासक शब्दांमुळे माझ्या समोरच्या समस्यासुद्धा म्यान होतात, असं वाटतं. त्यांनी माझ्याशी कधीही केवळ आमदार या भूमिकेतून कधीच संवाद साधला नाही. त्यांच्याशी निर्माण झालेल्या स्नेहामधून नेहमीच फक्त आदर, आश्वासक व्यक्ती, मार्गदर्शक, पितृतुल्य व्यक्तिमत्त्व असाच भास मला झाला आहे.

मी एक आंतरराष्ट्रीय महिला पैलवान आहे. चालू वर्षीची म्हणजे सन २०२३-२४ ची महिला उपमहाराष्ट्र केसरी आहे. भारतीय खेल प्राधिकरण (भारत सरकार) मुंबई येथे मी सध्या कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. माझी आणि महेशदादा यांची पहिल्यांदा भेट आणि संवाद झाला तो २०१७ मध्ये. राष्ट्रीय पातळीवर पिंपरी चिंचवड शहराला महिला कुस्ती वर्गातून मी पहिल्यांदा राष्ट्रीय पदक मिळवून दिले. त्यावेळी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस महेशदादा होते. महेशदादा यांना माझ्याबद्दल विशेष अभिमान वाटला तो म्हणजे एक मुलगी असून देखील कुस्ती या खेळात घेतलेले राष्ट्रीय पदक. त्यावेळी दादांनी पहिल्यांदा माझा सत्कार केला. कुस्तीबद्दल चर्चा आणि मार्गदर्शन केले. एक आमदार म्हणून नव्हे तर एक पैलवान म्हणून केलेले मार्गदर्शन माझ्यासाठी ऊर्जादायी ठरले.

मी आत्ता कुठे १८ वर्षांची आहे. मी अजूनपर्यंत मतदानाचा हक्क बजावलेला नाही. मी एक गोष्ट सांगू इच्छिते कि मी जेव्हा जेव्हा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा खेळले, पदकं मिळविली तेव्हा किंवा कोणतीही अडचण आली असेल तेव्हा मी महेशदादानां फोन केला आणि तेव्हा तेव्हा दादांनी माझा फोन लगेच उचला आहे. माझी विचारपूस केली आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. विचार करायला लावणारी बाब आहे, एक कार्यसम्राट आमदार माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलीचा फोन उचलतात आणि म्हणतात, बोल बाळा काही अडचण आणि काय पाहिजे सांग?, हे शब्द किती प्रेरणा आणि उर्जा देणारे ठरू शकतात, याची कल्पना अन्य कोणालाही येऊ शकणार नाही. आमच्यासारख्या धडपडणाऱ्या खेळाडूंना, असाच खंबीर, आश्वासक, धीरोदात्त मार्गदर्शक आणि नेता हवा असतो. दादांकडून माझ्यासाठी प्रत्येक वेळी येणाऱ्या आश्वासक शब्दांचे कारण म्हणजे, आमदार पैलवान महेशदादा आणि कुस्तीचे अतूट नाते ! “

मी कुस्ती या खेळात आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहराचे, महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. या यशात महेशदादांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खूप मोठा वाटा आहे. दादांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन असेल, परदेशी कुस्ती प्रशिक्षणासाठी केलेली आर्थिक मदत असेल, महेशदादा माझ्यासाठी मार्गदर्शक आहेतच पण माझ्या सारख्या अनेक सर्वसामान्य कुटुंबासाठी , खेळाडूसाठी महेशदादा म्हणजे एक “आधार” आहेत…!

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"