फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
सांस्कृतिक

गौरी सजावट स्पर्धेत शोभा लूकर प्रथम

गौरी सजावट स्पर्धेत शोभा लूकर प्रथम

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : वूई टुगेदर फाउंडेशन वतीने आयोजित घरगुती गौरी -गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच चिंचवड येथे झाला.

गौरी व गणपती सजावट स्पर्धेत शोभा लुकर यांना प्रथम क्रमांक, अनिता भारुळे यांना द्वितीय, मेघा जाधव यांना तृतीय, पूजा जैन यांना चौथा क्रमांक जाहीर झाला. गणपती सजावट स्पर्धेत पृथ्वीराज मोरे (प्रथम), दिलीप चक्रे (द्वितीय), चंद्रशेखर पगार (तृतीय), ऋषिकेश वाळुंज यांना चतुर्थ क्रमांक जाहीर झाला. यावेळी क्रांतिकुमार कडुलकर, रवींद्र देशपांडे, नंदू भोगले, सोनाताई गडदे, दारासिंह मन्हास आदी उपस्थित होते. वैशाली देशमाने यांचा गौरव झाला आहे. मंगला डोळे -सपकाळे, अर्चना बच्चे, जयंत कुलकर्णी यांचा गौरव केला.

गणेश बच्चे, राजू कोरे, पोपट बच्चे, रोहिणी बच्चे, अर्चना बच्चे, काजल बच्चे, अक्षय गारगोटे, असावरी बच्चे, आकाश खिल्लारे यांनी संयोजन केले. मधुकर बच्चे यांनी मार्गदर्शन केले. दारासिंग मन्हास यांनी आभार मानले. मंगला डोळे – सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"