फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
कला साहित्य

प्रमोद मराठे, डॉ. शरद अगरखेडकर यांचा गौरव

प्रमोद मराठे, डॉ. शरद अगरखेडकर यांचा गौरव

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : संत विचार प्रबोधिनीच्या वतीने देण्यात येणारा कलागौरव पुरस्कार गांधर्व संगीत महाविद्यालयाचे संचालक प्रमोद मराठे यांना आणि गुरुवर्य सेवा पुरस्कार डॉ शरद अगरखेडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी अशी माहिती प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ भावार्थ देखणे यांनी प्रसिद्दीपत्रकाद्वारे दिली.

पुण्यातील शनिवार पेठेतील चिंतामणी गृहनिर्माण सोसायटीमध्ये येत्या २६ ऑक्टोबरला होणाऱ्या संगीत महोत्सव सोहळ्यात गुरुवर्य सेवा आणि कला पुरस्कार पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सचिन इटकर, प्रसिद्ध दिग्दर्शक दीपक लांजेकर उपस्थित राहणार आहेत.

संगीत सोहळ्यातील कार्यक्रम
सुरुवातीला आळंदी सोहळ्याचे विश्वस्त योग्य निरंजननाथ यांच्या हस्ते वीणा पूजन होणार आहे. यावेळी भंडारा डोंगर दशमी समितीचे बाळासाहेब काशीद, प्रशांत महाराज मोरे, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे शाहीर हेमंत मावळे उपस्थित राहणार आहेत. दुपारी तीन वाजता गोरज देखणे यांची प्रवचन सेवा त्यानंतर अभय महाराज नलगे यांचे कीर्तन, सायंकाळी सव्वा पाच वाजता सोमनाथ तरटे व सुरत तरटे यांचा पारंपरिक अध्यात्मिक गोंधळ, सायंकाळी सहाला पुरस्कार वितरण सोहळा. त्यानंतर शुभम खंडाळकर यांचे शास्त्रीय गायन आणि अवधूत गांधी यांच्या अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे.

डॉ. भावार्थ देखणे म्हणाले, ”पुण्यातील शनिवार पेठेतील चिंतामणी गृहनिर्माण सोसायटीमधील निवासस्थानी कार्यक्रम हॊणार आहे. गुरुवर्य अनंतराव देखणे आणि इंदिरा देखणे यांच्या स्मृतीनिमित्त हा सोहळा होणार आहे. त्यास उपस्थित रहावे.”

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"