फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

चिंचवड विधानसभा : जगताप कुटुंबाला भाजपमधून विरोध

चिंचवड विधानसभा : जगताप कुटुंबाला भाजपमधून विरोध

चिंचवड : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विविध मतदारसंघातील नेते, इच्छुक तयारीला लागले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपमधील नेत्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आमदार अश्र्विनीताई जगताप आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष शंकर जगताप यांच्या उमेदवारीला आता भाजपमधूनच माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे , चंद्रकांत नखाते एकवटले आणि काही माजी नगरसेवकांची बैठक घेऊन विरोध दर्शवला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप किंवा आमदार अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच भाजपमधूनच त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध होत आहे. माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते आणि शत्रूघ्न काटे यांनी एकत्र येत माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला काही नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

जगताप कुटुंबातील व्यक्तींना सोडून आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्यावी तरच आम्ही पक्षाचे काम करू असा ठराव या बैठकीत करण्यात आल्याची माहिती विश्र्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जगताप कुचुंबियांना उमेदवारी देण्यावरुन शहर भाजपा मध्ये अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. बैठकीला माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रूघ्न काटे, संदीप कस्पटे, कैलास बारणे, सिद्धेश्वर बारणे, बाळासाहेब ओव्हाळ, माधुरी कुलकर्णी, सुनीता तापकीर, सविता नखाते, यांच्यासह भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राज तापकीर, शहर उपाध्यक्ष राम वाकडकर आदी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"