फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पुणे

डंपरच्या धडकेत युवतीचा मृत्यू

डंपरच्या धडकेत युवतीचा मृत्यू

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : पुण्यात कोथरूड बसस्थानकासमोर रस्ता ओलांडणाऱ्या तरूणीला डम्परने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डम्परचालक फरार झाला आहे.

कोथरूडचा बस स्टँड हा कायम गजबजलेला आणि वर्दळीचा परिसर आहे. बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हाच रस्ता ओलांडत असताना एका तरूणीला डम्परने धडक दिली आहे. या धडकेनंतर तरूणीच्या डोक्यावरून डम्परचे चाक गेले आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यावर तरूणीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता.

आरती सुरेश मनवाणी (वय २३, रा. एरंडे होस्टेल भेलके नगर) असे अपघातात मरण पावलेल्या युवतीचे नाव आहे. कोकण एक्सप्रेस हॉटेल येथून कर्वे रोडने डिव्हायडर वरून रस्ता ओलांडत असताना डम्परची धडक लागून जागीच मरण पावली. अपघातानंतर चालक पळून गेला आणि पोलिसांनी डम्पर ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर, आरती ही मूळची अमरावती येथील आहे. कोथरूड स्टॅन्ड समोर सिग्नलवरून ती चालत असताना डिव्हायडर वरून रस्ता ओलांडत होती. त्यावेळी डंपर डम्पर आल्याने ती चाकाखाली गेली. मिक्सर चालकाने या घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेचा अधिक तपास अलंकार पोलीस करत आहेत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"