फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

मोहनदादा भूमकर सर्वाधिक ऊस पुरवठादार

मोहनदादा भूमकर सर्वाधिक ऊस पुरवठादार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला गळीत हंगाम २०२३-२०२४ या वर्षात सर्वाधिक ऊस पुरवठा केल्याबद्दल वाकड गावातील प्रगतशील शेतकरी आणि माजी स्वीकृत नगरसदस्य मा. मोहनदादा आबाजी भूमकर यांना सलग सातव्या वर्षी सर्वाधिक ऊस पुरवठादार शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात झालेल्या वार्षिक सभेत भूमकर यांचा सन्मान करण्यात आला. माजी खासदार आणि कारखान्याचे संस्थापक चेअरमन श्री नानासाहेब तथा विदुराजी नवले आणि खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री.मोहनदादा आबाजी भूमकर, उपाध्यक्ष श्री. बापूसाहेब भेगडे, संचालक श्री. बाळासाहेब विनोदे, श्री. ज्ञानेशजी नवले व विविध मान्यवर उपस्थित होते.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"