इंद्रायणीत आढळला मृतदेह

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंद्रायणी नदीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मृतदेह मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंद्रायणी नदी पात्रात मंगळवारी दुपारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात गंभीर जखमा आहेत. डोक्यात दगड घालून खून करत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीत फेकला असल्याची शक्यता आहे. हा खून सोमवारी (१९ ऑगस्ट) दुपारी झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृतदेह आढळलेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. दिघी पोलीस तपास करीत आहेत.