फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
गुन्हेगारी

अनाथ अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

अनाथ अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी: आळंदीमधील अनाथ मुलांच्या निवासी संस्थेत देखरेख ठेवणाऱ्या कर्मचाऱ्याने एका १२ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. ही घटना १७ ऑगस्ट रोजी पहाटे घडली. पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

व्यंकटेश काशिनाथ माळनूर (रा. आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित १२ वर्षीय मुलाने आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीमध्ये अनाथ मुलांच्या निवासाची व्यवस्था राखणारी संस्था आहे. त्या संस्थेत आरोपी व्यंकटेश हा देखरेख ठेवण्याचे काम करतो. तर पीडित मुलगा अनाथ असून तो त्या संस्थेत निवास करत असून बाहेर एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे. शनिवारी पहाटे पाच वाजता आरोपी हा पीडित मुलाच्या खोलीत आला. त्याने मुलाला उठवले. टिव्ही असलेल्या खोलीत नेले. तिथे मुलाला मोबाईल पाहायला देऊन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आळंदी पोलिस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"