धुळ्यातून ११११ फूटाची तिरंगा रॅली

धुळे : भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी धुळ्यातही असाच आगळा वेगळा उपक्रम झाला. अखंड भारत संकल्पा दिनानिमित्त धुळे शहरातून ११११ फूटाच्या तिरंग्याची रॅली काढण्यात आली.
हिंदवी स्वराज्य संघटनेने या रॅलीचे आयोजन केले होते. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या रॅलीमध्ये उपस्थित होती. हजारोंच्या संख्येने शाळकरी विद्यार्थ्यांसह धुळ्यातील नागरिकही मोठ्या प्रमाणावर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. शहरभरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.