फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक

केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक

कोल्हापूर : कोल्हापूरचा मानबिंदू असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री अचानक आग लागली. नाट्यगृहाचा बहुतांश भाग लाकडाचा असल्यामुळे ते पूर्ण नाट्यगृह बघता बघता आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि बेचिराख झाले. कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील अनेक कलाकारांच्या या नाट्यगृहाशी आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले यांची आज (९ ऑगस्ट) जयंती आणि जयंतीच्या पूर्वसंध्येला ही दुर्घटना घटली.

केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग मैदानाच्या व्यासपीठाला लागलेल्या अस्पष्ट आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. आगीचे लोळ हवेत पसरू लागताच परिसरात खळबळ उडाली. अग्निशामक दलाच्या आठ ते नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र आगीने इतके भयंकर रौद्र रूप धारण केले होते, ही संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाले आणि आता सभागृहाचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला आहे. या नाट्यगृहाशी जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील अनेक कलाकारांचे जिव्हाळ्याचे नाते होते. आगीत जीवितहानी झाली नाही. नाट्यगृहाचा बहुतांश भाग लाकडाचा असल्यामुळे आगीने वेगाने पेट घेतला.

केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी काही नाट्यप्रयोगांचे विशेष आयोजनही करण्यात आले होते. काही कार्यक्रमही या निमित्त होणार होते. गुरुवारी संध्याकाळपर्यंत या कार्यक्रमाची तयारी महापालिका प्रशासन आणि नाट्यगृह कर्मचाऱ्यांकडून सुरू होती. रात्री साडेआठच्या सुमारास मंचावरील सगळी तयार पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी बाहेर पडले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास खासबाग मैदानाच्या बाजूने जनरेटर खोलीजवळ स्फोट झाल्याचा आवाज झाला. शेजारीच असलेल्या खाऊ गल्लीतील तरूण धावत मैदानाच्या दिशेने गेले. तेव्हा खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने ही आग नाट्यगृहाच्या गॅलरीपर्यंत पोहोचलेली दिसली. त्यानंतर अग्निशामक दलाची पथकं बोलावण्यात आली. शाहूकालीन खासबाग मैदानाचा मंच सुद्धा या आगीत पेटला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नाट्यागृहाच्या पुन्हा उभारणीच्या कामासाठी दहा कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. राज्याचे नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ही माहिती दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"