दुचाकी घसरून चालकाचा मृत्यू

प्रतिनिधी, पिंपरी : समोरच्या गाडीला ओव्हरटेक करताना पावसाच्या पाण्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (११ जुलै) तळेगाव-चाकण मार्गावर महाळुंगे येथे घडला.
अल्लाउद्दीन मोहमंद मोमीन (वय ३८, रा. महाळुंगे) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी संतोष रामचंद्र सणस (वय ४७, रा. सणसवस्ती, आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लाउद्दीन एका दुचाकीवरून जात होते. पुढील गाडीला ओव्हरटेक करताना पावसाच्या पाण्यात दुचाकी घसरली आणि ते पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.