Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
पिंपरी-चिंचवड

भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात!

भोसरी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात!

गणेशभक्तांच्या अलोट गर्दीत गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन; पारंपरिक वाद्यांसह विविध रथांनी वेधले लक्ष
पिंपरी : भोसरी परिसरातील गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि शांततामय वातावरणात पार पडली. ढोल-ताशा, ढोल-लेझीम, पारंपरिक वाद्ये तसेच डीजेच्या गजरात गणरायाचा जयजयकार करत गणेशभक्त मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

viara vcc
viara vcc

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी येथील बापूजी बुवा चौकात गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळांच्या स्वागतासाठी भव्य स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या ठिकाणी गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा सहाय्यक अतुल पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि कार्यकारी अभियंता किरण अंदुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

indra dairy
indra dairy

भोसरी येथील स्वागत कक्षाच्या ठिकाणी पहिली गणेश विसर्जन मिरवणूक दुपारी दीड वाजेच्या सुमारास दाखल झाली. वीर हनुमान मित्र मंडळ, भोसरी गावठाण या मंडळाने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली. विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या. शेवटची गणेशमूर्ती विघ्नहर्ता मित्र मंडळ, विठ्ठल नगर, लांडेवाडीची गणेश विसर्जन मिरवणूक भोसरी येथील स्वागत कक्षाच्या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ झाली.

या विसर्जन मिरवणुकीत वीर हनुमान मित्र मंडळ, लोंढे तालीम मित्र मंडळ, श्री कानिफनाथ मित्र मंडळ, नव महाराष्ट्र तरुण मंडळ, हिंदवी स्वराज्य तरुण मित्र मंडळ अँड ट्रस्ट, फुगे माने तालीम मंडळ, धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, छत्रपती श्री शिवाजी तरुण मित्र मंडळ, कै. दामू शेठ गव्हाणे मित्र मंडळ, लांडगे लिंबाची तालीम मंडळ, नरवीर तानाजी मित्र मंडळ, पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ, खंडोबा मित्र मंडळ, मधले फुगे तालीम मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, गव्हाणे तालीम मित्र मंडळ, भगवान गव्हाणे मित्र मंडळ, विनर्स मित्र मंडळ, नाथसाहेब प्रतिष्ठान, महात्मा फुले मित्र मंडळ, भोलेश्वर मित्र मंडळ, युवा सारथी मित्र मंडळ आणि विघ्नहर्ता मित्र मंडळ आदी गणेश मंडळांनी सहभाग घेतला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"