जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाची हत्या; सहा जणांना अटक!

पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवार 30 ऑगस्ट रोजी वराळे, शिक्षक कॉलनी, परिसरात तळेगाव दाभाडे येथे घडली. प्रशांत शिंगाडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी सुभाष विष्णू शिंगाडे (वय 50, रा. समता कॉलनी, वराळे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साहिल पांडुरंग समूखराव (वय 18), सुनील पांडुरंग समूखराव (वय 24), एस दीपक लोखंडे (वय 19), रोहन हनुमान सावंत (वय 19), हेमराज गौतम सोनवणे (वय 28), रोशन साव (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य दोन विधी संघर्षित बालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत प्रशांत शिंगाडे हा आपल्या मित्रासोबत चहा पिण्यासाठी थांबला असताना आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी कोयत्याने डोक्यावर, हातावर, छातीवर व पाठीवर वार केले. तसेच डोक्यात मोठे दगड मारून त्याचा खून करण्यात आला असे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहिते करीत आहेत.

