आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न!

पंढरपूरात वैष्णवांचा महासागर
पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक पार पाडली. या पूजेचा मान मिळणारे वारकरी बाबासाहेब माधव माने व सौ प्रभावती बाबासाहेब माने हे देखील यावेळी उपस्थित होते. आज शुद्ध एकादशी निमित्त पंढरपूरात वैष्णवांचा महासागर लोटला होता. भक्तीमय वातावरणात पांडुरंगाच्या दर्शनाने भाविक सुखावले होते.
“टाळ वाजे, मृदुंग वाजे! वाजे विठूचा, विना!
वारकरी आले पंढरपुरा! मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा!”

महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पवित्र दर्शनाने मन कृतार्थ झाले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी, युवक आणि प्रत्येक नागरिकांच्या सुख समृद्धी उत्तम आरोग्य व मंगलमय भविष्यासाठी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली. बळीराजाच्या श्रमांना यश लाभो आणि आपला महाराष्ट्र सदैव प्रगतीपथावर राहो हेच मागणे विठ्ठल चरणी मागितले.
शासकीय महापूजेसाठी यंदा धाराशिव जिल्ह्याला मानाचा बहुमान मिळाला आहे. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गौरगावचे रहिवासी असणारे माने दापत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले आहेत. विठ्ठल मंदिरात आले की ऊर्जा मिळते. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे हेच विठुरायाकडे साकडे घातले. तरुणाईला दिशा देण्यासाठी पंतप्रधान मोदींना आशीर्वाद आशीर्वाद द्यावा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पंढरपुरातील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पादुका मंदिराच्या नव्या भक्त निवासाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.
विठ्ठलाची शासकीय पूजा झाल्यानंतर आळंदी देवस्थानच्या वतीने पंढरपुरात नवीन भक्त निवास उभे केले जात आहे या भक्त निवासाचा भूमिपूजन सोहळा यांच्या हस्ते संपन्न झाला. आषाढी एकादशी नंतर जुने पंढरपूर इतिहास जमा होणार असून मंदिर परिसरात विशाल असा कॉरिडॉर उभा करण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे शेकडो वर्षाचे वाडे आणि जुन्या इमारती इतिहास जमा होणार आहेत. यंदाची आषाढी ही आमच्या पिढ्यानपिढ्यांसाठी कायम स्मरणात राहील ही कटू आठवण म्हणून आम्ही ती जतन करू अशा पद्धतीचे निराजनक उदगार मंदिर परिसरातील बाधित नागरिकांकडून काढण्यात येत आहेत. या कॉरिडोर नंतर भविष्यात पुढील 50 वर्षाचा भाविकांचा विचार करून ही विकास कामे सुरू केली आहेत असे ते म्हणाले.

