Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

ज्येष्ठ महिला नागरिकाचे आठ लाख रुपये किंमतीचे दागिने गेले चोरीला!

ज्येष्ठ महिला नागरिकाचे आठ लाख रुपये किंमतीचे दागिने गेले चोरीला!

आळंदी : ज्येष्ठ महिलेच्या हॅन्डबॅग मधील पर्स काढून त्यामधील आठ लाख दहा हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना बुधवार एक जून रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास माऊली मंदिराजवळ, साळी धरणे धर्मशाळे समोर, आळंदी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी सौ लता अंकुश चौधरी (वय 65, रा. दीपमाळ मशिनरी कंपनीच्या बाजूला, गोलेगाव, ता. खेड) या जेष्ठ नागरिक महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 23 वर्षीय महिलेच्या विरोधात आळंदी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या बहिणीच्या घरी माऊली मंदिराजवळ, साळी धर्मशाळेसमोर आल्या होत्या. फिर्यादीच्या परवानगीशिवाय आरोपीने फिर्यादीच्या हॅन्डबॅग मधील पर्स काढून त्यामधील आठ लाख दहा हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गिरी गोसावी हे तपास करत आहेत

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"