फक्त मुद्द्याचं!

19th June 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात; आजपासून सुरु!

पिंपरी चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात; आजपासून सुरु!

पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा ; पाणी जपून वापरा नागरिकांना आवाहन
पिंपरी : पवना धरणातील उपयुक्त पाणीसाठा १९ टक्के शिल्लक राहिल्याने आणि यंदाच्या मान्सूनला झालेल्या विलंबामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या सूचना पुणे पाटबंधारे विभागाने पिंपरी चिंचवड महापालिकेला दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शहराच्या पाणी पुरवठ्यात आज शुक्रवार, १९ जून २०२६ पासून १५ टक्के कपात करण्यात येत असून नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे आगामी कालावधीतील पाण्याची उपलब्धता आणि वाढती मागणी लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील पाणीपुरवठ्यात आवश्यक ती कपात करण्यात आली असल्याचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले आहे.

उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा. वाहन धुणे, बागांना अतिरिक्त पाणी देणे, नळ विनाकारण सुरू ठेवणे यांसारख्या बाबी टाळून पाणी बचतीत सक्रिय सहभाग नोंदवावा. पाण्याची बचत ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, पाणी बचतीचे नियम पाळून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहल महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"