फक्त मुद्द्याचं!

13th June 2026
गुन्हेगारी

पोलीस भरतीत नोकरी लावून देण्याचे अमीष ;3 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक!

पोलीस भरतीत नोकरी लावून देण्याचे अमीष ;3 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : पोलीस भरतीत नोकरी लावून देतो असे सांगून ऑनलाइन पद्धतीने 3 लाख 75 हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली. ही घटना जुलै 2024 पासून आज पर्यंत वाघोली, मोशी , मुंबई व छत्रपती संभाजी नगर येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी मयूर भाऊसाहेब पोळ (वय 24, रा. गुरुकृपा निवास, राधाकृष्णनगर टोल नाका जवळ, मोशी, मुळगाव – भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सुरज रामदास शिवले (वय 35, रा. वखारीचा मळा, वढू बुद्रुक ,ता. शिरूर), बिपिन दीपक मोहिते (वय 40 ,नाशिक, पूर्ण पत्ता माहीत नाही), संतोष चंद्रकांत कटारे (वय 38, रा. मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी जुलै 2024 मध्ये रायगड पोलीस भरतीसाठी अर्ज भरला होता .त्या अनुषंगाने वाघोली पुणे येथील जिद्द अकॅडमी मध्ये पोलीस भरतीची प्रॅक्टिस चालू केली .त्यादरम्यान फिर्यादीची ओळख आरोपी क्रमांक एक यांच्याशी झाली. त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना पोलीस भरतीत नोकरीस लावून देतो असे सांगून फिर्यादीला आरोपी क्रमांक दोन व आरोपी क्रमांक तीन यांच्याशी ओळख करून दिली. आरोपी क्रमांक एक यांनी त्याच्याकडून ऑनलाइन स्वरूपात 1 लाख 50 हजार रुपये घेतले. त्यापैकी 25 हजार रुपये परत केले आहेत. राहिलेली 1 लाख 25 हजार रुपये रक्कम परत केली नाही. तसेच आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादी कडून ऑनलाइन स्वरूपात 2 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. आरोपी यांनी संगणमत करून फिर्यादीला नोकरीचे आमिष दाखवून व विश्वास संपादन करून 3 लाख 75 हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पानसरे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"