फक्त मुद्द्याचं!

13th June 2026
गुन्हेगारी

एमडी (मॅफेड्र्रॅान) हा 11 लाख 55 हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त!

एमडी (मॅफेड्र्रॅान) हा 11 लाख 55 हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त!

पिंपरी : बेकायदेशीररित्या एमडी (मॅफेड्र्रॅान) हा 11 लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये किंमतीचा अंमली पदार्थ विक्री करण्याकरता वाहतूक करताना मिळून आला. याबाबत एका व्यक्तीस अटक करण्यात आली असून चार व्यक्ती फरार आहेत. ही कारवाई गुरुवार 11 जून रोजी औजान मोटर्स गॅरेज समोर लक्ष्मी चौक, मुकाई नगर, हिंजवडी येथे करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी सुभाष राजेंद्र गुरव पोलीस शिपाई, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अक्षय प्रदीप धायगुडे (वय 31, रा. अहिरेगाव, ता. खंडाळा, जि. सातारा), दयानंद उत्तम धायगुडे (वय 38, ता. खंडाळा, जि. सातारा), महेश पुनाराम किचड उर्फ विष्णोई (वय 21, रा. अहिरे गाव, ता. खंडाळा, जि. सातारा, मूळ पत्ता- कुसलावा, ता. लोहवट, जि. फलोदी, राजस्थान) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. अश्फाक झाकीर हुसेन काझी उर्फ मनुशेठ रा. अहिरे, ता. खंडाळा, जि. सातारा), हनुमान किलेरी उर्फ विष्णूई रा. खंडाळा, जिल. सातारा) हे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांच्या ताब्यात एकूण 11 लाख 55 हजार 500 रुपये किंमतीचा 61 ग्रॅम 70 मिलिग्रॅम वजनाचा एमडी (मॅफेड्र्रॅान) हा अंमली पदार्थ संगणमत करून बेकायदेशीरित्या विक्री करण्याकरिता वाहतूक करताना मिळून आला. हा एमडी अंमली पदार्थ कोणाकडून आणला याबाबत आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी पाहिजे आरोपी एक व दोन यांचे कडून विक्रीकरिता आणल्याचे सांगितले. पोलिसांनी एक चार चाकी, तीन मोबाईल व दीड हजार रुपये रोख आणि एमडी ((मॅफेड्र्रॅान) जप्त केले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"