फक्त मुद्द्याचं!

13th June 2026
गुन्हेगारी

अवैध हातभट्टी दारू विक्री ठिकाणे जेसीबीच्या साह्याने उध्वस्त!

अवैध हातभट्टी दारू विक्री ठिकाणे जेसीबीच्या साह्याने उध्वस्त!

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याची कारवाई
चाकण : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील अवैध हातभट्टी व दारू विक्रीवर दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन मार्फत सहा ठिकाणच्या हातभट्टी दारू विक्री केंद्रे निष्काशीत करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ चार श्वेता खेडकर यांनी दिली आहे.

viara vcc
viara vcc

फुगेवाडी आणि हडपसर येथील विषारी हातभट्टी दारूमुळे 27 जणांना आपले प्राण गमवावे लागले यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्यांच्या हद्दीतील हातभट्टी दारू विक्री संपूर्णपणे नष्ट करण्याचा उद्देश ठेवून गेल्या पंधरा दिवसापासून कारवाई मोहीम उघडली आहे.

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हातभट्टी दारू विक्री करणारे सराईत आरोपींवर जोरदार कारवाई करण्यात आली. दारू विक्रीसाठी सराईत आरोपींनी अनाधिकृत ठिकाणे बांधली असल्याचे निदर्शनास आले .त्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग व एमआयडीसी विभाग यांनी संयुक्त कारवाई करून आरोपींची अवैध हातभट्टी दारू विक्रीची ठिकाणे जेसीबीच्या साह्याने कायमची नष्ट केली.

यामध्ये सुरेश रमेश राठोड (सिग्मा चौक, महाळुंगे ता. खेड), लखन जडजा शिंदे (सिग्मा चौक, महाळुंगे, ता. खेड) , पुष्पा देवी शांतीलाल जाट (हिंदुस्थान पेट्रोल पंप तळवडे ब्रिज, निघोजे, ता. खेड) , लखन हजुरिया ठाकूर (डिके चौक, कुरुळी ता. खेड) , उदय अशोक कलाल (एचपी पेट्रोल पंपाजवळ तळवडे रोड) , सुस्मिता बंडू हितेज (सुभाषवाडी, निघोजे ,ता. खेड) या आरोपींची हातभट्टी दारू विक्रीची ठिकाणे उध्वस्त केली.

ही कारवाई पोलीस उपयुक्त श्रीमती श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम महाळुंगे विभाग ,दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ व अधिकारी, अंमलदार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक दिवसे व पथक, एमआयडीसी विभागाचे अधिकारी कर्डिले व त्यांचे पथक यांनी केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"