फक्त मुद्द्याचं!

2nd June 2026
पिंपरी-चिंचवड

विश्व पर्यावरण दिनानिमित्त ५ व ६ जून रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्कमध्ये विविध उपक्रम!

विश्व पर्यावरण दिनानिमित्त ५ व ६ जून रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्कमध्ये विविध उपक्रम!

पिंपरी : पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे विश्व पर्यावरण दिनानिमित्त ५ व ६ जून २०२६ रोजी विविध शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या “निसर्गाकडून प्रेरित. हवामानासाठी. आपल्या भविष्यासाठी” या जागतिक संकल्पनेला अनुसरून पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि हवामान बदलाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

viara vcc
viara vcc

१. पोस्टर प्रदर्शन – “वातावरण कृती आराखड्यामध्ये मुले, तरुण आणि नागरिकांचा सहभाग” (दि. ५ व ६ जून २०२६)
पर्यावरण संवर्धन व वातावरण कृती आराखड्यामध्ये नागरिक, युवक आणि मुलांची भूमिका अधोरेखित करणारे पोस्टर प्रदर्शन सायन्स पार्कच्या स्वागत कक्षात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे यांच्या द्वारा पिं.चिं.मनपा यांच्या प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आले आहे.

२. निसर्गभ्रमण व आपल्या वृक्षवल्लींची ओळख (दि. ५ जून २०२६)
सायन्स पार्क परिसरातील वृक्ष, वनस्पती यांची ओळख करून देणारे निसर्गभ्रमण आयोजित करण्यात आले आहे.

३. खुली प्रश्नमंजुषा – “पुणे परिसरातील आपल्या नद्या” (दि. ५ व ६ जून २०२६)
पुणे परिसरातील नद्या, त्यांचे पर्यावरणीय महत्त्व आणि संवर्धन याविषयी माहिती देणारी खुली प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात येणार आहे.

४. कमी खर्चातील निसर्गपूरक पक्ष्यांची घरटी बनविण्याची कार्यशाळा (दि. ६ जून २०२६)
पक्षी संवर्धनाचा संदेश देणारी एकदिवसीय कार्यशाळा अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आयोजित करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ७७४४९४४३३३ यावर संपर्क करावा.
पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत भविष्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या सर्व उपक्रमांमध्ये पर्यावरणप्रेमी जनसामान्य तसेच शालेय विद्यार्थी, पालकवर्गांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व निसर्ग संवर्धनात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक-संचालक प्रवीण तुपे यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"