फक्त मुद्द्याचं!

31st May 2026
पिंपरी-चिंचवड

आरसीबी ज्युनिअर संघाने ४ गडी राखून मिळविले स्पर्धेचे विजेतेपद !

आरसीबी ज्युनिअर संघाने ४ गडी राखून मिळविले स्पर्धेचे विजेतेपद !

दिवेकर क्रिकेट प्रीमियर लीग(ज्युनिअर गट)
पिंपरी : दिवेकर क्रिकेट अकॅडमीच्या ५० षटकांच्या ज्युनिअर गटाच्या (११ ते १३ वर्षे) प्रीमियर लीगचा अंतिम सामना, एमआय ज्युनिअर विरुद्ध आरसीबी ज्युनिअर संघात झाला . हा सामना आरसीबी ज्युनिअर संघाने ४ गडी राखून जिंकून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. शनिवार दिनांक ३० मे रोजी राजमाता जिजाऊ नगर रावेत येथील क्रीडांगणावर झाला.

viara vcc
viara vcc

हा सामना आरसीबी ज्युनिअर संघाने ४ गडी राखून जिंकला व या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. एमआय ज्युनिअर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले या सामन्यात शिवांश सुकाळे (१३३ धावा २६ चौकार) व श्लोक जगदाळे (१०२ धावा २२ चौकार ) यांनी आपल्या संघासाठी सुंदर शतके झळकावली. या अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला श्लोक जगदाळे (आरसीबी ज्युनिअर संघ.)

एमआय ज्युनिअर ५० षटके ८ बाद २९३ धावा:- पार्थ कुलकर्णी ३७, विजय शेलार २३, शिवांश सुकाळे १३३ धावा (२६ चौकार), आराध्या महाजन २०, अतुल केसरकर ४/३७, प्रशांत सोनवणे २/३२.
आरसीबी ज्युनिअर ४७.५ षटके ६ बाद २९५ धावा :- प्रशांत सोनवणे ४५, पार्थ तावरे ४३, श्लोक जगदाळे १०२ (२२ चौकार), शिवांश सुकाळे २/४८.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"