फक्त मुद्द्याचं!

22nd May 2026
गुन्हेगारी

ट्रकच्या जोरदार धडकेने दिल्याने तरुण कामगाराचा मृत्यू!

ट्रकच्या जोरदार धडकेने दिल्याने तरुण कामगाराचा मृत्यू!

पिंपरी : संत तुकारामनगर मेट्रो रेल्वे स्टेशन खाली झाडांना टॅंकरने पाणी टाकत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना संत तुकारामनगर मेट्रो रेल्वे स्टेशन, मेट्रो रेल्वे पिलर क्रमांक 335, पुलाखाली घडली. शेषराव गौतम श्यामसुंदर (वय 22) असे मृत्यू झालेल्या तरुण कामगाराचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी गणेश शंकर जाधव (वय 36, आबा काटे चाळ , बौद्ध विहाराच्या जवळ, दापोडी )यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ट्रक चालक नरेश कुमार सुरेंद्र दास (वय 24, रा .मू .बेदरगाव, महाराष्ट्र मेडिकल जवळ, पोस्ट. नावडा, ता. पनवेल, जि. रायगड, मुळगाव- वार्ड नंबर 10, मढीया पी. एस. बासूपट्टी महिल ,मधुबनी, बिहार) या आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनच्या पिलर क्रमांक पी/ 335 जवळ, मेट्रो रेल्वे पुलाखालील झाडांना पाणी टाकत असताना फिर्यादी यांचे टँकरच्या पाठीमागून येणारा ट्रक क्रमांक एम. एच. 43/ बीजी, 30 20) ट्रकने पाण्याच्या टँकरला पाठीमागून जोरात धडक देऊन टँकरचे नुकसान केले. या धडकेमध्ये फिर्यादीच्या सोबत काम करणारा कामगार शेषराव गौतम श्यामसुंदर (वय 22, रा. आबाकाटे चाळ, स्मशानभूमी जवळ, दापोडी) हा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"