म्हाडाचा रो हाऊस खरेदी करून देतो असे सांगून 74 लाखाची फसवणूक!

पिंपरी : संत तुकाराम नगर येथील म्हाडाचा रो हाऊस खरेदी करून देतो असे पती-पत्नीस सांगून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख व ऑनलाइन स्वरूपात 74 लाख वीस हजार रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना मार्च 2024 ते 21 मे 2026 या कालावधीत संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडली.

या प्रकरणी पुनम रामप्रसाद शर्मा (वय 44, संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रदीप मारुती गोपालघरे (रा. कोथरूड ,पुणे), गोकुळ नामदेव मोहिते (आंबेगाव खुर्द, आंबेगाव गावठाण, मारुती मंदिराजवळ), निखिल अबाजी पवार (वय 35, 267 /2 ,खराळवाडी, पिंपरी), कुलदीप सिंग मोहिंदर सिंग लोधी (वय 56, 455/ 25 31,संततूकारामनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक ते तीन यांनी आपसात संगणमत करून संत तुकाराम नगर येथील ययाती गल्ली नंबर एक येथील 14 नंबरचा म्हाडाचा रो हाऊस खरेदी करून देतो असे फिर्यादी व त्यांच्या पतीस सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी कडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरूपात 74 लाख वीस हजार रुपये घेऊन फसवणूक केली. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडे हे तपास करत आहेत.

