फक्त मुद्द्याचं!

15th May 2026
पिंपरी-चिंचवड

जैवविविधतेबाबत आणि नदीच्या संवर्धन निकडीबाबत रिव्हर रिव्हायवल’कडून निवेदन!

जैवविविधतेबाबत आणि नदीच्या संवर्धन निकडीबाबत रिव्हर रिव्हायवल’कडून निवेदन!

पिंपरी : पुणे, पिंपरी- चिंचवड रिव्हर रिव्हायवल’च्या प्रतिनिधींनी पिंपरी-चिंचवड आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बागडे आणि महापौर रवीभाऊ लांगडे यांच्यासमोर मुळा नदीच्या काठांवरील समृद्ध जैवविविधतेबाबत आणि नदीच्या संवर्धनाच्या निकडीबाबत सविस्तर निवेदन सादर केले, तसेच सादरीकरणही केले.

viara vcc
viara vcc

नागरिकांच्या वतीने नदीच्या काठांवरील क्षेत्रांच्या (riparian zones) पर्यावरणीय महत्त्वावर प्रकाश टाकला. ही क्षेत्रे विविध प्रकारची वने, गवताळ प्रदेश आणि पाणथळ जागांच्या परिसंस्थांचे घर आहेत. नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्पाचा या संवेदनशील अधिवासांवर होऊ शकणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली.

या बैठकीदरम्यान, आयुक्तांनी नदीकाठच्या क्षेत्रांचे पर्यावरणीय महत्त्व मान्य केले आणि स्पष्ट केले, की नदीकाठच्या समृद्ध परिसंस्थेचे संरक्षण व संवर्धन सुनिश्चित करण्यासाठी या योजनांमध्ये योग्य ते बदल केले जातील. ‘पुणे पिंपरी-चिंचवड रिव्हर रिव्हायवल’ने या आश्वासनाचे स्वागत केले, तसेच शहरी नद्यांच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक, पारदर्शक आणि लोकसहभागावर आधारित नियोजनाचा आग्रह धरला. नद्यांची स्वच्छता आणि त्यांचे पुनरुज्जीवन या बाबींना इतर सर्व गोष्टींपेक्षा अग्रक्रम दिला गेला पाहिजे, यावर उपस्थितांमध्ये एकमत झाले.

यावेळी शुभम पांडे, तुषार शिंदे, सूर्यकांत मुथियान, शैलजा देशपांडे, प्राजक्ता महाजन, संजीव नाईक, राहुल करंबेळकर, कल्याण माने. उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"