ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन 5 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : ज्येष्ठ नागरिकाच्या व्हाट्सअप वर एपीके फाईल पाठवून त्यांना डाउनलोड करायला लावून मोबाईल मध्ये एक्सेस घेऊन फिर्यादी यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून 4 लाख 99 हजार 774 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना 8 मे ते 9 मे 2026 या कालावधीत बी दोन, नंदादीपश्री हाउसिंग सोसायटी, सेक्टर 26, निगडी प्राधिकरण येथे घडली.
सदाशिव गोखले (वय 77) यांनी रावेत पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जेष्ठ नागरिक असून त्यांच्या व्हाट्सअप वर आरोपीने एपीके फाईल पाठवून फिर्यादी यांना डाऊनलोड करायला लावली व फिर्यादीच्या मोबाईल मध्ये ॲक्सेस घेऊन फिर्यादी यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून चार लाख 99 हजार 747 रुपये एवढी रक्कम काढून आर्थिक फसवणूक केली. रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फटांगरे हे तपास करत आहेत.

अंमली पदार्थ गांजा जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक!
पिंपरी : अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीर रित्या जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवार 14 मे रोजी म्हसोबा मंदिराजवळील पायवाटेवर, दळवी नगर झोपडपट्टी, पत्रा शेड, निगडी येथे करण्यात आली.
याबाबत संतोष बिभीषण सपकाळ पोलीस शिपाई, अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. प्रकाश तुकाराम शिंगे (वय 35, रा. संजीव हॉटेल चौक, ओटा स्कीम निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रकाश शिंगे यांनी 26,600 रुपये किंमतीचा 406 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे विक्री करिता जवळ बाळगला. अमली पदार्थ गांजा आरोपीने कोणाकडून आणला याबाबत चौकशी केली असता ओटा स्कीम निगडी येथील एका महिलेचे नाव आरोपीने सांगितले.निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे तपास करीत आहेत.

