फक्त मुद्द्याचं!

12th May 2026
पिंपरी-चिंचवड

क्रिकफिटनेट अकॅडमी संघाचा 7 विकेट्स राखून विजय!

क्रिकफिटनेट अकॅडमी संघाचा 7 विकेट्स राखून विजय!

एसजेएसएफ कॉर्पोरेट शिल्ड स्पर्धेची दमदार सुरुवात
पिंपरी : रावेत येथील चॅम्पियन्स अरेना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या एसजेएसएफ कॉर्पोरेट शिल्ड (“SJSF Corporate Shield”) क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. उद्घाटनाच्या सामन्यात Might Conquerors Club (MCC) आणि CricFitNet Academy यांच्यात रोमांचक सामना रंगला. क्रिकफिटनेट अकॅडमी (CricFitNet Academy) संघाने 7 विकेट्स राखून विजय मिळवला.

viara vcc
viara vcc

नाणेफेक जिंकून CricFitNet Academy संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना MCC संघाने 20 षटकांत सर्वबाद 153 धावा केल्या. संघाकडून मयुरेश पाटील यांनी 43 धावा तर कर्णधार निखिल मानकर यांनी 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

क्रिकफिटनेट अकॅडमी (CricFitNet Academy) कडून गोलंदाजीत शंकर कांबळे यांनी 4 षटकांत 22 धावा देत 2 बळी घेतले, तर विक्रम भोसले यांनी 23 धावांत 2 बळी मिळवले.

154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना क्रिकफिटनेट अकॅडमी संघाने शानदार फलंदाजी करत 17.3 षटकांत 3 बाद 154 धावा करून 7 विकेट्स राखून विजय मिळवला. पवन ओंकार यांनी 54 धावांची दमदार खेळी केली, तर संख यांनी 42 धावांचे योगदान दिले.

MCC कडून बिपिन पांडे यांनी 4 षटकांत 38 धावा देत 1 बळी घेतला, तर निखिल मानकर यांनी 3 षटकांत 21 धावा देत 1 विकेट मिळवली. सामनावीर पुरस्कार संख यांना देण्यात आला, तर “फायटर ऑफ द मॅच” पुरस्कार निखिल मानकर यांना मिळाला.
ही स्पर्धा SJ Sports Foundation – Sports Event & Management यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"