फक्त मुद्द्याचं!

10th May 2026
गुन्हेगारी

प्लॉट खरेदी करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक!

प्लॉट खरेदी करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक!

पिंपरी : प्लॉट खरेदीचा एमओयु दस्त करताना फसवणुकीच्या उद्देशाने प्लॉटचा सर्वे गट नंबर नमूद न करता, खरेदी खता द्वारे विकत न देता फसवणूक केली. ही घटना 23 जुलै 2019 ते 9 मे 2026 या कालावधीत घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी जितीन बाळू भोसले (वय 39, रा. भोसले वस्ती, माण ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पूर्णचंद्र जैन (रा. अशोक नगर, बिल्डिंग नंबर दोन, आरबी 35, लिंक रोड, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना मौजे डोणे, ता. मावळ येथील प्लॉट नंबर 281 क्षेत्र 2076 स्क्वेअर फुट क्षेत्र 4 लाख 98 हजार 240 रुपयाला विकत द्यायचे ठरवून त्याप्रमाणे वेळोवेळी फिर्यादी यांनी चेक द्वारे 2 लाख 70 हजार रुपये दिले. नोटराईज एमओयु करून त्यामध्ये जाणून-बुजून फसवणूक करण्याच्या उद्देशाने मौजे डोणे येथील प्लॉटचा सर्वे गट नंबर नमूद न करता केवळ प्लॉट नंबर 281 असे मोघम नमूद करून फिर्यादी यांना प्लॉटचे खरेदी खताद्वारे विकत न देता तसेच फिर्यादीकडून प्लॉट करिता घेतलेले पैसे परत न देता पैशाचा अपहार करून विश्वासघात करून फिर्यादीची दोन लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी हे तपास करत आहेत. प्लॉट खरेदी करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"