फक्त मुद्द्याचं!

10th May 2026
गुन्हेगारी

गांजा मिश्रित गोळ्यांची विक्री ;एकास अटक!

गांजा मिश्रित गोळ्यांची विक्री ;एकास अटक!

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी : खेड तालुक्यातील नाणेकरवाडी परिसरात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत गांजा मिश्रित गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली. आरोपीकडून गांजा मिश्रित गोळ्या प्रतिबंधित गुटखा व मोबाईल असा एकूण 2 लाख 41 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाणेकरवाडी येथील एका भाड्याच्या खोलीत गांजा मिश्रीत गोळ्यांची बेकायदा विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून राहुल सिंग हेमराज सिंग लोधी (वय 25, नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ – रा .मध्य प्रदेश) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपीकडून 149.715 ग्रॅम वजनाच्या गांजा मिश्रित गोळ्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा तसेच एक मोबाईल जप्त करण्यात आला.

दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात एनडीपीएस कायदा 1985 तसेच अन्नसुरक्षा मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी अंमली पदार्थ बाबत कोणतीही माहिती मिळाल्यास पोलीस हेल्पलाइन 112 किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 प्रवीण मोरे. यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जिलानी मोमीन, पोलीस हवालदार निखिल शेटे, कपिलेश इगवे, निखिल वर्पे, सदानंद रुद्राक्षे, पोलीस आमदार सुभाष गुरव व सपकाळ यांनी केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"