फक्त मुद्द्याचं!

14th June 2026
गुन्हेगारी

भोसरीत तीन पत्ते जुगारावर पोलिसांचा छापा; सहा जण ताब्यात!

भोसरीत तीन पत्ते जुगारावर पोलिसांचा छापा; सहा जण ताब्यात!

पिंपरी : तीन पत्ते जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवार 16 एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास जुना कचरा डेपो रोड सदगुरूनगर येथील मोकळ्या जागेत करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी ज्ञानेश्वर लक्ष्मण साळवे पोलीस शिपाई, भोसरी पोलीस ठाणे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजाभाऊ गोविंद पालकर (वय 51, रा. सरस्वती बिल्डिंग, राधाकृष्णनगर, चक्रपाणि वसाहत), सुभाष ताबरू राठोड (वय 39, रा. शिवशंभू कॉलनी, नंबर एक, सदगुरूनगर), अभय बाजीराव ओव्हाळ (वय 38, सॅंडविक कॉलनी, दिघी रोड), अकबर मुनीर शेख (वय 52, सदगुरूनगर, जुना कचरा डेपो रोड), रामदास पोपट गायकवाड (वय 42, रा. चक्रपाणी वसाहत, शंभूराजे कॉलनी, नंबर पाच), देवा मानू राठोड (वय 36, रा, गृहलक्ष्मी कॉलनी, संत सेवालाल बिल्डिंग, सदगुरूनगर )या आरोपींवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसरी जुना कचरा डेपो रोड, सदगुरूनगरच्या मोकळ्या जागेत सर्व आरोपी तीन पत्ते जुगार खेळत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून एकूण चार लाख 16 हजार 890 जुगाराचे साहित्य मोबाईल, दुचाकी व चार चाकी, रोख रकमेसह जप्त करण्यात आले. भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टापरे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"