फक्त मुद्द्याचं!

13th April 2026
महाराष्ट्र

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीची वर्स स्टाईल गायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि तब्बल सहा दशके सिनेसृष्टीतीला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशाताईंच्या निधनाची बातमी दिली. त्यांच्यावर सोमवार 13 एप्रिल रोजी चार वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल .

viara vcc
viara vcc

भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना शनिवारी अस्वस्थ वाटू लागल्याने ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताई यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. दहाव्या वर्षापासून त्यांनी गायनाची सुरुवात केली. 1947 साली आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

विविध भाषांमध्ये सुमारे 12000 पेक्षा जादा गाणी गायली
आशा भोसले यांनी केवळ हिंदी नाहीतर मराठी, गुजराती, तमिळ, तेलगू, बंगाली अशा विविध भाषांमध्ये सुमारे 12000 पेक्षा जादा गाणी गायली आहेत. सर्वात जास्त गाणी गायल्यामुळे त्यांची वर्ल्ड ऑफ गिनीज बुक मध्ये नोंद झाली आहे. आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी स्वतःचं खास स्थान निर्माण केले होते. त्यांनी क्लासिकल पासून, कॅब्रे, पॉप, गझल आणि रोमँटिक गाण्यांपर्यंत प्रत्येक प्रकारात आपली वेगळी छाप पाडली. आपल्या कारकिर्दीत त्यांना सात राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण देऊन त्यांचा गौरव केला. हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन ,ओपी नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत अनेक आजरामर गाणी त्यांनी गायली आहेत .मराठी गाण्यांमध्ये अभंग, कविता, आणि लावण्या अशी सर्व प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत.

सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,शिवसेना प्रमुख (उबाठा) उध्दव ठाकरेयांच्यासह सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे . आशाताई भोसले यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्यातील कलावंत आणि आशाताई सोबत असलेल्या जवळीकतीचे पदर आपल्या प्रतिक्रियेतून उलगडले आहेत .अशा ताईंचं जाणं म्हणजे भारताच्या रेनेसॉस युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातून गेला अशी भावना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"