फक्त मुद्द्याचं!

13th April 2026
गुन्हेगारी

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ;आरोपी अटकेत!

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ;आरोपी अटकेत!

पिंपरी: भरधाव वेगात असलेल्या बसने दुचाकी स्वराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वराला मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 10 एप्रिल रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास महादेव मंदिर समोर, वराळे फाटा, मावळ येथे घडली .

याबाबत मनोज अरुण ठाकरे (वय 25, भीमाशंकर कॉलनी, वराळे फाटा, ता. मावळ ,मुळगाव -सुटकळ, ता. चोपडा, जि. जळगाव) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन दत्तात्रय हराळे (वय 33, रा. गट नंबर 377, संत तुकाराम नगर रोड, राजे शिवछत्रपती हाउसिंग सोसायटी, येलवाडी, ता. खेड) असे अटक बस चालक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे मेहुणे शेखर राजेंद्र बाविस्कर (वय 28 ,रा भेगडे कॉलनी, वराळे फाटा, ता. मावळ, मुळगाव- भोकर, ता. जि. जळगाव) हे त्यांच्या मोटरसायकल क्रमांक (एम. एच- 45, वाय ,56 58) वरून जेसीबी कंपनी नऊ लाख उंबरे ते वराळे फाटा असे जात असताना महादेव मंदिर समोर आले असता समोरून येणाऱ्या बस क्रमांक (एम.एच, 14, सी डब्ल्यू/ 4108) ने समोर येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी स्वार राजेंद्र बाविस्कर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाले. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोवारकर हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

मुलीच्या शिकवणीसाठी पैसे मागितल्याने पत्नीला मारहाण!
पिंपरी: मुलीच्या शिकवणीसाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला काठीने बेदम मारहाण केली. तसेच सासूने देखील मारहाण केली. चरोली येथील तनिश प्राईड सोसायटीत हा प्रकार घडला.

याबाबत दिपाली माधव पवार (वय 28, रा. चरवली बु ,मूळ- चांदवड, नाशिक) या महिलेने फिर्यादी आहे. तर तिचा पती माधव एकनाथ पवार आणि सासू पार्वतीबाई एकनाथ पवार या दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने मुलीच्या शिकवणीचे शुल्क मागितले त्या रागातून आरोपी माधव याने शिवीगाळ केली व काठीने पाठीवर, तोंडावर आणि डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. तसेच सासू मुक्ताबाई हिने मारहाण केली व घराबाहेर हाकलून दिले. कारणावरून पत्नीला मारहाण

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"