कपडे बदलताना महिलांचे चित्रीकरण; दुकानदार अटकेत!

पिंपरी : कपड्याच्या दुकानातील स्टोअर रूममध्ये कपडे बदलण्यासाठी आलेल्या ग्राहक महिलांचे गुपचूप चित्रीकरण करून त्यांचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 16 मार्च रोजी कामशेत येथे घडली. मुकेश मुथा (रा. कामशेत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे
याप्रकरणी पीडित महिलेने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीचे मुकेश फॅन्सी कॉर्नर नावाचे कपड्याचे दुकान असून त्याने दुकानातील स्टोअर रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला होता. दरम्यान चित्रीकरण होत असल्याची माहिती असतानाही तो महिलांना कपडे बदलण्यासाठी स्टोअर रूममध्ये पाठवत होता. फिर्यादी महिलेने याबाबत आरोपीकडे जाब विचारला असता त्याने दमदाटी केल्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गोपनीय माहिती चोरून प्रतिस्पर्धी कंपनीला पुरवली ; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी : कंपनीतील गोपनीय माहिती चोरून प्रतिस्पर्धी कंपनीला पुरवल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
याप्रकरणी सागर कानवडे यांनी तक्रार दाखल केली आहे. निखिल कुटे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने कंपनीतील मटेरियल व ई-मेल मधील माहितीचे फोटो मिळवून ते स्वतःकडे ठेवले .नंतर नोकरी सोडून प्रतिस्पर्धी कंपनीत रुजू होत ही माहिती वापरून समान कच्चामाल मागविला. या प्रकारातून कंपनीची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. उत्तर माहाळुंगे पोलीस तपास करत आहेत.

