शोरूमची बनावट पावती देऊन 1 लाख 5 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी :नवीन अल्टो रिक्षा देण्याच्या नावाखाली रिदम ऑटो विनोदे वस्ती, वाकड ,शोरूमची बनावट पावती देऊन एक लाख 5 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 10 फेब्रुवारी 2025 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान रिदम ऑटो, विनोदे वस्ती, वाकड येथे घडली.

याबाबत विकास अभिमन्यू वाघमारे (वय 43, रा. सर्वे नंबर शिव कॉलनी, संदीप नगर, थेरगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. किशोर उर्फ सचिन सुधाकर बागडे (रा खांदवे त्यांचे चाळीत, विठाई निवास, वडगाव शिंदे रोड, लोहगाव, मूळ रा. शिवले वस्ती, भीमा कोरेगाव, ता शिरूर जिल्हा पुणे )असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने नवीन अल्टो रिक्षा देण्याच्या नावाखाली फिर्यादी कडून पाच हजार रुपये बुकिंग साठी व एक लाख रुपये रोख घेऊन रिदम ऑटो विनोदे वस्ती वाकड, शोरूमची बनावट पावती देऊन फसवणूक केली. विना परमिट, विना नंबर, विना इन्शुरन्स ऑटो रिक्षा दिल्याने फिर्यादीने आक्षेप घेतला. सदरची ऑटोरिक्षा दापोडी येथील शोरूम ला जमा केली .आजपर्यंत ऑटोरिक्षा करिता भरलेले एक लाख पाच हजार रुपये परत न करता विश्वासघात करून फिर्यादीची तसेच रिदम ऑटो शोरूम ची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे हे तपास करत आहेत.

