फक्त मुद्द्याचं!

10th April 2026
गुन्हेगारी

प्रेम संबधात अडथळा होत असल्याने प्रियकराच्या मदतीने सहा वर्षाच्या मुलाचा खून!

प्रेम संबधात अडथळा होत असल्याने प्रियकराच्या मदतीने सहा वर्षाच्या मुलाचा खून!

महिलेला अटक ; तिचा प्रियकर फरार
पिंपरी : प्रेम संबधात अडथळा होत असल्याने प्रियकराच्या मदतीने सहा वर्षाच्या मुलाला पाण्याच्या बादलीत डोके बुडवून दाबून तसेच बाथरूम मध्ये भिंतीवर व जमिनीवर डोके आपटून जीवे ठार मारले. ही घटना 4 एप्रिल 2026 रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान कुरुळी ,ता. खेड जिल्हा पुणे येथे घडली. याबाबत एका महिलेला अटक करण्यात आली असून प्रियकर फरार आहे.

viara vcc
viara vcc

याबाबत इसाक महंमद शेख (वय 49, रा, मु.पो. पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत एक 27 वर्ष महिला रा.कुरूळी, सुरज मेदनकर यांच्या भाडेच्या खोलीत, ता. खेड) माहेरचे गाव- धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड, सासरचा पत्ता- पुस, ता. आंबेजोगाई, जि. बीड) या महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड (दोघे रा. सध्या भाड्याच्या खोलीत कुरुळी, ता. खेड, मूळ गाव- पुस ,ता. आंबेजोगाई, जि. बीड )अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा नातू आवेज मेहबूब शेख (वय सहा) त्याची आई आरोपी नंबर एक व तिचा प्रियकर आरोपी नंबर दोन यांचे प्रेम संबंध होते.प्रेम संबधात अडथळा निर्माण होत असल्याचे कारणावरून दोघांनी संगनमत करून बाथरूम मधील पाण्याच्या बादलीत अवेज शेख याचे डोके बुडवून, दाबून धरून तसेच बाथरूम मध्ये भिंतीवर व जमिनीवर डोके आपटून ठार मारले.

त्यानंतर मृतक अवेज शेख याचे प्रेत महिला आरोपी व राम कजेवाड यांनी आर्टिका गाडीमधून धर्मापुरी ता. परळी जिल्हा बीड येथे घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी अवेज यास हृदयविकाराचा झटका आल्याने मयत झाला आहे असा बनाव करून, कटकारस्थान करून वस्तुस्थिती लपवून ठेवली. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली असता, शवविच्छेदन कार्यवाही केली. त्यानंतर आरोपी नंबर एक महिलेस विचारपूस केली तिने वरील प्रमाणे हकीगत सांगितली दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जायभाये हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"