पाच जणांच्या टोळक्याची दहशत; तरुणावर कोयत्याने वार!

तीन अल्पवयीन मुलांचा आरोपीत समावेश
पिंपरी : ब्लिंकीट सुपरस्टार मधील मिळणाऱ्या ऑर्डरचे कारणावरून वादावादी होऊन पाच जणांच्या टोळक्याने एकाला डोक्यात, हातावर कोयत्याचा वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शनि वार 28 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ब्लिंकीट सुपर स्टोअर महादेवनगर भोसरी येथे घडली.

याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याबाबत उमेश गजानन आसणे (वय 17, रा. हनुमान कॉलनी, नंबर 3, चक्रपाणि वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कैलास दगडू फुलमाळी (वय 19, रा. चक्रपाणी वसाहत ,भोसरी), रमेश सिद्धाप्पा कुंभार (धावडे वस्ती, भोसरी) व तीन अल्पवयीन मुलांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार .आरोपी क्रमांक एक ते पाच यांनी संगनमताने युनिकॉर्न मोटरसायकल व अँक्टिवा स्कुटी वरून आले होते. ब्लिंकिट सुपरस्टार मधील मिळणाऱ्या ऑर्डरचे कारणावरून गेल्या पंधरा दिवसापासून जखमी व आरोपी यांच्यात वाद सुरू होता. फिर्यादी यांचा भाऊ गणेश गजानन आसणे यांच्या डोक्यात हातावर आणि अन्य ठिकाणी कोयत्याने मारून जखमी केले . आरोपी क्रमांक चार व पाच यांनी सुपर मार्केट मध्ये जाणाऱ्या लोकांना आत मध्ये जाण्यास प्रतिबंध केला. त्यानंतर ते हातात कोयते घेऊन लोकांना कोयते दाखवून कोणी मध्ये आल्यास अशीच अवस्था करू असे बोलून दहशत निर्माण केली. भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टापरे हे तपास करत आहेत.

