भोंदूअशोक खरात प्रकरण; उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर खळबळजनक आरोप!

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची पत्रकार परिषद
पुणे : शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या गेली पाच ते सहा वर्ष भोंदू बाबा अशोक खरात यांच्याकडे जात होत्या, त्यांना विधान परिषदेवर आमदारकी हवी होती असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

अशोक खरात पाथर्डी येथील पैसा हॉटेलमध्ये नीलम गोऱ्हे यांना भेटायला देखील आला होता. तो तिथे तुम्हाला भेटण्यास का आला होता? तुमच्यात आणि त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार आहेत का? आणखीन काही हे सगळ्या गोष्टी समोर यायला हव्यात. इतर वेळेस नीलम गोऱ्हे अनेक गोष्टीवर बोलतात. परंतु आत्ता भोंदू बाबा अशोक खरात वर का बोलत नाहीत असा प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
याशिवाय नाशिक मधील एक्सप्रेस इन हॉटेलमध्येही नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात यांची भेट झाली. आमदारकी आणि मंत्रीपदासाठी अनेक वेळा भेटल्या होत्या असा धक्कादायक आरोपही तृप्ती देसाई यांनी केला आहे. नीलम गोऱ्हे या गेले सात ते आठ वर्षापासून अशोक खरातला ओळखत आहेत. नीलम गोऱ्हे यांची अशोक खरात यांच्याशी काही आर्थिक देवाण-घेवाण आहे का? याबाबत एसआयटीमार्फत त्यांची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर तृप्ती देसाई यांनी आरोप केल्याने या प्रकरणात आणखी किती राजकारणी, प्रशासकीय अधिकारी यांची पोलखोल होते हे पाहणे गरजेचे आहे.

