फक्त मुद्द्याचं!

28th March 2026
गुन्हेगारी

मोबाईल फोन वरून मटका जुगार खेळविणाऱ्या आरोपीस अटक!

मोबाईल फोन वरून मटका जुगार खेळविणाऱ्या आरोपीस अटक!

पिंपरी : मोबाईल फोनवर मटका जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली .ही कारवाई शुक्रवार 27 मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आझाद चौक, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली येथे करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी शशिकांत देवराम नांगरे पोलीस शिपाई, गुन्हे शाखा युनिट तीन यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आकाश शंकर तापकीर (वय 30, रा. हनुमान मंदिरा शेजारी, चोविसावाडी, चऱ्होली ता. हवेली, सुमित उर्फ बाळा येवले (रा. श्रीराम कॉलनी, चऱ्होली), अनिल तापकीर (चोविसावाडी, चऱ्होली), प्रतीक कदम (रा. निरगुडी, ता. हवेली )अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी क्रमांक एक आकाश तापकीर यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नंबर एक हा आरोपी नंबर दोन, तीन व चार यांचे सांगण्यावरून मोबाईलवर मटका जुगार घेत असताना एकूण एक लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमालासह यामध्ये एक एप्पल कंपनीचा आयफोन, रोख रक्कम, एक टी व्ही एस कंपनीची जुपिटर मोटरसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"