चैनीसाठी घरफोडी वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक

पिंपरी : दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी ताब्यात घेऊन चार गुन्हे उघड केले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमळ परिमंडळ दोनचे विशाल गायकवाड यांनी दिली आहे.

ताथवडे येथील डेरी फार्म समोरून एक दुचाकी मोपेड चोरी गेल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या चोरीचा तपास करत असताना या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेचे निरीक्षण करून गुन्ह्यातील चोरीस गेलेली एक्सेस दुचाकी वर आरोपी आदिल नुमान खान (वय 25, रा. 1/ बी/ 201 ,सॅन्टेक्स बेस्ट वर्ल्ड नायगाव, मुंबई) हा आरोपी मिळून आला. आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने वाकड पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी चोरीचा गुन्हा केला असल्याचे कबूल केले. आरोपीस बुधवार 24 मार्च रोजी अटक करून न्यायालयाकडून पोलीस कस्टडी प्राप्त करण्यात आली.
कस्टडीनंतर तपासात आरोपीने मुंबई तसेच शिरवळ, सातारा या ठिकाणी अन्य गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक आरोपी कडून एकूण चार गुन्ह्यांमधील दोन मोपेड दुचाकी, तीन मोबाईल फोन, मेक बुक, एअरपोड चार्जर ,डिजिटल गेमिंग प्ले स्टेशन, कंट्रोलर ,ॲडपटरअसा एकूण दोन लाख 67 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सुनील कुऱ्हाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, किशोर पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बिभीशन कनेरकर, सहाय्यक पोलीस फौजदार संदीप गवारी, पोलीस हवालदार चंदू गिरे, साबळे, घाडगे, वडेकर, भुसारे, तात्यासाहेब शिंदे, झेंडे, कौतेय खराडे, विक्रम भगत, कांबळे, मांडे, गायके यांच्या पथकाने केली. आरोपीने मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर पिंपरी चिंचवड, पुणे भागात आणखी घरपोडी, वाहन चोरी सारखे गुन्हे केल्याची दाट शक्यता असून दाखल गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे हे करत आहेत.

