फक्त मुद्द्याचं!

9th March 2026
गुन्हेगारी

 स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; एकास अटक

 स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; एकास अटक

  पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली पीडित महिलांना पैशाचे आमीष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या व्यक्ती विरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवार 6 मार्च रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास हेवन स्पा (Heaven Spa) ओम हाइट्स बिल्डिंग, तिसरा मजला, शॉप नंबर 301, हिंजवडी या ठिकाणी घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत नीलम संतोष बुचुडे महिला पोलीस हवालदार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .वासुदेवन मनी पिल्लेय (वय 41, रा. लेन नंबर 3 ,अभिमान श्री बंगलो नंबर तीन, गणेश ऑटो सर्विस ,पाषाण रोड, पाषाण) असे अटक केलेल्या स्पा मॅनेजरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हेवन स्पा सेंटरचा मॅनेजर असून सेंटरच्या नावाखाली पीडित महिलांना पैशाचे आमीष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता. या अनैतिक व्यवसायच्या चारही बाजूला नागरिक वास्तव्यास असताना सार्वजनीक ठिकाणी हा व्यवसाय केला जात होता. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे अधिक तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"